महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा स्त्री रुग्णालय ( लेडीह्यडिंग )या ठिकाणी देण्यात आले निवेदन
अकोला:-हिंदू जननायक सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा संपर्कप्रमुख विठ्ठलराव लोखंडकार व जिल्हाध्यक्ष राजेश काळे ,शहर संघटक अरविंद शुक्ला ,शहराध्यक्ष राकेश शर्मा, यांच्या मार्गदर्शनाने शहर उपाध्यक्ष शेखर पोटदुखे यांच्यावतीने निवेदन देण्यात आले त्यामध्ये सहकार्य शहर प्रसिद्धी प्रमुख प्रशांत मगर (पाटील )यांनी केले जिल्हा स्त्री रुग्णालय या ठिकाणी मागील बाजूमध्ये असलेल्या मेन गेट खालील नाली वरील असलेले लोखंडी पाइपाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे व तसेच त्या ठिकाणावरील ओ.पी.डी ही सुरू केलेली आहे .त्यामुळे तिथून जात असणाऱ्या नागरिकांना व गर्भवती महिलांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो.
तिथून जाणाऱ्या टू व्हीलर. फोर व्हीलर गाडी तसेच पैदल चालणाऱ्या नागरिकांना अशाप्रकारे जीवघेणा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे तेथील त्या लोखंडी पाइपांना हटवून सिमेंट काँक्रिटीकरण करावे किंवा तेथील अवस्था ही व्यवस्थित रित्या करावी याकरिता निवेदन देण्यात आले. कुणाल निधाने,सोनू बानोरकर,सचिन तायडे,सुमित मोडके,कुणाल जाधव, अविनाश मुरेकर,महेश मोडतकर,छोटू चादुरकर,निखिल पराते,दिनेश पराते ,सचिन आदी उपस्थित होते..