महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आज अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
महात्मा बसवेश्वर यांनी जातीभेद निर्मूलन व समानतेसाठी कार्य केले, त्यांचे कार्य व विचार आजही प्रेरणादायी आहे,असे उद्गार या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी काढले. यावेळी महाराष्ट्र विरशैव्य सभाचे माजी अध्यक्ष विश्वनाथ हजारे, उपाध्यक्ष महेश शेटे, राजेश रामगवळी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत.