अकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्य सवलतीचा लाभ दिला जातो. परंतु ज्या पात्र लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याची आवश्यकता नाही, अशा सधन नोकरदार,पेंशनधारक, व्यवसायी व पाच एक्कर पेक्षा जास्त शेती असणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांनी स्वत:हून अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडावे. अन्यथा अपात्र शिधाधारकांवर सोमवार दि. 24 एप्रिलपासून फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. नोकरवर्ग, व्यवसायी व सधन शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेवू नये शासकीय व निमशासकीय नौकरीत असणारे लाभार्थी, खाजगी नौकरी, व्यवसाय करणारे ज्यांचे उत्पन्न 60 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे असे लाभार्थी, चार चाकी वाहन असणारे लाभार्थी, पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन असणारे सधन शेतकरी व पेंशनधारक लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनाचा लाभ घेत असल्यास अशा अपात्र शिधाधारकांनी स्वत:हून अन्न धान्य लाभ योजनेतून बाहेर पडावे. याकरिता जिल्ह्यातील सर्व तहसिल व अन्नधान्य वितरण कार्यालय शनिवार व रविवार दि. 22 व 23 एप्रिल रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरु राहिल. तरी अपात्र कार्ड धारकांनी स्वत:हून अन्नधान्य योजनेतून बाहेर पडावे. अन्यथा सोमवार दि. 24 एप्रिलपासून दक्षता समितीमार्फत तपासणी मोहिम राबवून अपात्र कार्डधारकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहे.
सधन लाभार्थ्यांनो अन्नधान्य योजनेतून बाहेर पडा; अपात्र धारकांवर होणार कारवाई:जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
bySatish Lahulkar
-
0