लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचारमंथन मेळावा संपन्न
अकोला - (स्वप्निल देशमुख बुलढाणा)लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना पत्रकार प्रश्न आणि त्यांच्या विकासासाठी लढा देतांनाच पत्रकारिता आणि सामाजिक संकल्पना घेऊन चालणारी संघटना आहे.त्यामुळे नविन सामाजिक संकल्पनांवर विचार करतांना संघटनेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचार आणि तत्वांच्या प्रसारार्थ कार्यक्रमात येणाऱ्या अतिथींना सत्कारादाखल ग्रामगीता भेट दिल्या जात होत्या.आता इतरही पुस्तके भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी कथा,कादंबऱ्या,शौर्यगाथा व विविध विषयांवरील पुस्तक वितरणाच्या या उपक्रमासाठी
प्रसंगी समाजातून सहकार्य घेऊन ही चळवळ विद्यार्थ्यांपर्यंत व्यापक प्रमाणात पोहचवण्याचा मनोदय लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख( निंबेकर) व्यक्त केला.
समाज आणि विद्यार्थ्यांसाठी बुद्धीला चालना मिळून ज्ञानाच्या वृध्दीसाठी तथा जाणीव,जागृती आणि समाज आणि राष्ट्रीय विकासार्थ वैचारिक परिवर्तनासाठी वाचन संस्कृतीला नवी उर्जा देणे आवश्यक आहे.त्यासाठी पत्रकारांनी व समाजसेवी सहकाऱ्यांनी आपल्या प्रश्नांसोबत वैचारिक परिवर्तनाच्या या कार्यात सहभागी होऊन आपली सामाजिक संवेदनशीलतेची नवी ओळख निर्माण करावी अशी अपेक्षा संजय देशमुख यांनी व्यक्त केली. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा २० वा मासिक विचारमंथन मेळावा अकोला येथे जठार पेठेतील जैन रेस्ट्रो येथे संपन्न झाला.तेव्हा अध्यक्षिय भाषणातून ते बोलत होते.त्यांच्या या संकल्पनेला पहिला प्रतिसाद म्हणून पत्रकार महासंघाचे केन्द्रीय मार्गदर्शक पदाधिकारी प्रा.डॉ.संतोषजी हूशे यांनी महात्मा फुले यांची शंभर पुस्तके व सुप्रसिध्द कवी जिल्हा मार्गदर्शक सुरेशजी पाचकवडे यांनी सुध्दा त्यांच्या संग्रहातील पुस्तके देण्याचे अभिवचन यावेळी दिले. यावेळी सर्वप्रथम सामाजिक साधनेचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराजांना हारार्पण करून वंदन करण्यात आले.
याप्रसंगी दऊत लेखणी मासिकाचे संपादक विजयराव देशमुख,रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अशोककुमार पंड्या,अकोला जिहा देशमुख समाज मंडळाचे उपाध्यक्ष,माजी मुख्याध्यापक के.व्ही.देशमुख,डोंगरगावकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.श्री विजयराव देशमुख यांना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख पदावर, व के.व्ही.देशमुख यांची अकोला जिल्हा मार्गदर्शक पदाधिकारी म्हणून नियुक्तीची घोषणा करून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. के.व्ही.देशमुख यांच्या शिस्तबध्द आणि यशस्वी शैक्षणिक तथा सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सन्मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला.
सत्कारादाखल मनोगत व्यक्त करतांना त्यांनी व विजयराव देशमुख तथा अशोकजी पंड्या यांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या शिस्तबध्द,पारदर्शक कार्याचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.पुणे येथे मनिभाई देसाई प्रतिष्ठाणाच्या मनिभाई राष्ट्रसेवा पुरस्कारासाठी संघटनेच्या महाराष्ट्रातील १८ पदाधिकारी,सभासदांची निवड झाली असून,त्या समारंभानंतर १४ पदाधिकारी पालघर जिल्हा कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभात उपस्थिती आणि कोकण पर्यटनासाठी जाणार असल्याची माहिती अध्यक्ष संजय देशमुख यांनी यावेळी दिली.केन्द्रीय पदाधिकारी सौ जया भारती,इंगोले यांच्या संचालनाखाली झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय सचिव राजेन्द्र देशमुख,उपाध्यक्ष किशोर मानकर,मार्गदर्शक पदाधिकारी,शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळ सदस्य पुष्पराज गावंडे,प्रा.राजाभाऊ देशमुख,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,प्रा.डॉ.संतोषजी हूशे,अॕड.राजेश जाधव,कोषाध्यक्ष सिध्देश्वर देशमुख,सुरेशजी पाचकवडे,अकोला जिल्हाध्यक्ष मोहन शेळके,मनोज देशमुख,सतिश देशमुख,अथर्व देशमुख,सागर लोडम,रविन्द्र देशमुख,सौ.दिपाली बाहेकर,दिलीप नवले व ईतर पत्रकार उपस्थित होते.आभारप्रदर्शन सचिव राजेन्द्रजी देशमुख यांनी केले.