अकोला
: अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील कृषक भवन येथे मराठा
व्यवसाय संघ द्वारे आयोजित विदर्भ स्तरीय व्यावसयिक मेळावा श्री काळे कॅटरर्स
यांच्या सहकार्याने संपन्न झाला. या मेळाव्यास श्री. गजानन नारे (संचालक प्रभात
किड्स),
श्री. रोहित बावस्कर (जिल्हा समन्वयक, अण्णासाहेब
पाटील आर्थिक विकास महामंडळ), श्री अक्षय ठोकळ ( अकोला
जिल्हाध्यक्ष, रुरल चेंबर ऑफ कॉमर्स), श्री.
नेत्रदिप चौधरी (कार्यक्रम अधिकारी, MCED) व श्री विजय
देशमुख (प्रख्यात फ्रीलान्स ट्रेनर) व मराठा व्यवसाय संघ मुंबई टीम यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात शिवपूजनाने झाली तर प्रस्तावना श्री. प्रकाश देशमुख , प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, मराठा व्यवसाय संघ भारत यांनी केली सदर प्रस्तावनेत त्यांनी मराठा व्यवसाय संघाच्या उद्देश्य व कार्यप्रणाली बाबत विवेचन केले. तसेच मराठा व्यवसाय संघ अकोलाच्या अद्याप पावेतो प्रवासाची माहिती जिल्हाध्यक्ष मराठा व्यवसाय संघ श्री प्रसाद देशमुख जिल्हाध्यक्ष यांनी दिली.
कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना श्री गजानन नारे यांनी शैक्षणिक क्षेत्रातील आगामी संधी यावर मार्गदर्शन केले. श्री रोहित बावस्कर यांनी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ बाबत योजनांची सोप्याभाषेत उकल करून सांगितली. श्री अक्षय ठोकळ यांनी व्यावसायिक क्षेत्रातील चढ उतार आणि संघर्षबाबत विवेचन करतांना आधुनिक काळात किमान भांडवल गुंतवणुकीतून उभारण्यात येणाऱ्या उद्योगाबद्दल विवेचन केले.
कार्यक्रमाचे
मुख्य आकर्षण असणारे श्री नेत्रदिप चौधरी यांच्या व्याख्यानात त्यांनी शासनाच्या
अनेक योजना तपशीलवार मांडून स्पष्ट केल्या व त्याबाबत मार्गदर्शन केले व श्री विजय
देशमुख यांनी आपल्या ओघवत्या शैलीत व्यावसायिकाच्या परिवाराची जबाबदारी अधोरेखित
केली.
कार्यक्रमाच्या
शेवटच्या टप्प्यात अकोला टीमचे मार्गदर्शक डॉ. स्वप्नील गावंडे, डॉ. हेमंत हिंगणे, श्री प्रकाश देशमुख, श्री प्रसाद देशमुख, श्री विशाल तायडे, श्री सुशील देशमुख, श्री रोशन काळे, श्री शुभम बदरखे, श्री सतीश लहुळकर यांचा त्यांच्या
कार्याकरिता सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात स्टोल्स ची सुविधा उपलब्ध करून
देण्यात आली होती त्यात २० स्टॉल धारक व ९० नोंदणीकृत लाभार्थ्यांनी सदर
कार्यक्रमाचा लाभ घेतला व सदर कार्यक्रमास मुंबई, पुणे ,नागपूर, वर्धा, अमरावती ,
दर्यापूर,b बुलढाणा , खामगाव
, शेगाव , कारंजा, वाशिम व अकोला जिल्ह्यातील व्यवसायिक बांधव व भगिनी
आदी ही व्यावसायिकांनी उपस्थिती लावली हे विशेष.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन
श्री सुशील देशमुख यांनी केले असून कार्यक्रमातील भोजन व्यवस्था श्री भिसे व
श्री.काळे कॅटरर्स यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वी सादरीकरणा करिता श्री.
शेषराव जी काळे साहेब (काळे कॅटरर्स) श्री प्रकाश देशमुख, डॉ.
श्री स्वप्नील गावंडे, डॉ. श्री मदन महल्ले, डॉ. श्री हेमंत हिंगणे, श्री प्रसाद देशमुख, श्री विशाल तायडे, श्री सुशील देशमुख, श्री रोशन काळे, श्री शुभम बदरखे, श्री सतीश लाहुळकर, श्री वैभव गायकवाड, श्री पियुष देशमुख यांनी विशेष सहकार्य केले.