रोजगार इच्‍छूक युवक युवतींनी कौशल्‍य मागणी सर्वेत सहभागी व्‍हा; जिल्‍हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

 

रोजगार इच्‍छूक युवक युवतींनी कौशल्‍य मागणी सर्वेत सहभागी व्‍हा;

जिल्‍हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन





अकोला : जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कौशल्‍य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. कौशल्य मागणी सर्वेमध्ये जिल्‍ह्यातील 18 ते 45 वयोगटातील रोजगार इच्‍छूक महाविद्यालयीन युवक युवतींनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्‍हावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष कौशल्‍य रोजगार, उद्योजकता व नावीन्‍यता जिल्‍हा कार्यकारी समितीचे निमा अरोरा यांनी केले आहे.

जिल्‍ह्यातील सर्व महाविद्यालयांच्‍या प्राचार्यांना कौशल्‍य मागणी सर्व्‍हेमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी https://bit.ly/SkillSurveyAkola लिंक वर गुगल फॉर्ममध्ये आवश्‍यक माहिती सादर करावी. जिल्‍ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्‍या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्‍या तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्‍या विद्यार्थांसोबत संपर्क साधुन गुगल फॉर्म मधील माहिती प्राचार्यांनी भरुन घ्यावी.

जिल्‍ह्यातील युवक युवतींना खाजगी क्षेत्रातील सद्यास्थितीत कौशल्‍य, रोजगार, उद्योजकता व नाविन्‍यता जिल्‍हा कार्यकारी समितीमार्फत तयार करण्‍यांत आलेल्‍या जिल्‍हा कौशल्‍य विकास आराखडयाच्‍या माध्‍यामातून कौशल्‍य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. प्रमोद महाजन कौशल्‍य व उद्योजकता विकास अभियान व किमान कौशल्‍य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यासह केंद्र व राज्‍य शासनाच्‍या महत्‍वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमजबजावणी व्‍हावी याकरिता राज्‍यातील युवक युवतींनी आवश्‍यक असलेले आणि त्‍यांनी मागणी केलेले कौशल्‍य प्रशिक्षण प्रदान केल्‍यास उमेदवारांच्‍या प्रशिक्षणा दरम्‍यान स्‍वारस्‍यमध्‍ये वृध्‍दी होऊन अनुपस्थितीचे प्रमाण कमी होईल आणि प्रशिक्षण यशस्‍वी उमेदवाराना रोजगार स्‍वयंरोजगाराच्‍या अधिक प्रमाणात संधी उपलब्‍ध होतील.

सहायक आयुक्‍त, जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तथा सदस्‍य सचिव कौशल्‍य रोजगार, उद्योजकता व नावीन्‍यता जिल्‍हा कार्यकारी समिती यांचेकडे कौशल्‍य मागणी सर्व्‍हेच्‍या नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्‍यांत आली असून गुगल फॉर्ममध्‍ये माहिती सादर करतांना काही अडचण आल्‍यास जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत दुसरा माळा, अकोला या कार्यालयात प्रत्‍यक्ष अथवा 0724-2433849 या दूरध्‍वनी क्रमांकावर किंवा 9665775778 या भ्रमणध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधवा, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post