शासन आपल्या दारीअकोला येथील शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शासन आपल्या दारी

अकोला येथील शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला- शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी ‘शासन आपल्या दारी’, हे अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आज अकोला येथे  आयोजित  शिबिरात  नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शासन आपल्या दारी या अभियानाअंतर्गत आज अकोला येथे नियोजन भवनात शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आ. रणधीर सावरकर हे होते. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, अकोला पंचायत समिती सभापती सुलभा सोळंके, आ. हरिष पिंपळे, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसिलदार सुनिल पाटील आदी उपस्थित होते. 

प्रास्ताविक डॉ. शरद जावळे यांनी केले. सुत्रसंचालन ज्योती कराळे यांनी तर आभार प्रदर्शन तालुका कृषी अधिकारी जांभरुणकर यांनी केले.
आ. रणधीर सावरकर यांनी सांगितले की, हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला हे महत्त्वाचे. सामान्य माणसापर्यंत शासकीय यंत्रणा पोहोचते हे या उपक्रमाचे वेगळेपण. लोकांचे काम वेळेत होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने हे अभियान महत्त्वाचे आहे.या अभियानामुळे प्रशासनात गतिमानता येते. संगणकीकरण झाल्याने मानवी हस्तक्षेप कमी होऊन कामे वेगवान पद्धतीने होऊ लागली आहेत. निर्णयक्षम, भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा विकासाकडे नेऊ, असेही आ. सावरकर यांनी सांगितले.

आ. पिंपळे म्हणाले की, शासन आपल्या दारी हे शिबिर म्हणजे सर्व विभाग एकत्रितरित्या एकाच ठिकाणी जनतेसाठी उपलब्ध असतात. जनतेची सर्व कामे एकाच ठिकाणी होतात. जनतेचा वेळ वाचतो. या उपक्रमामुळे जनतेच्या कामांना गती मिळेल.  लोकांकडून आलेल्या सर्व अर्जांचा निपटारा प्रशासनाने करावा,अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आ. पिंपळे यांनी नागरिकांना केले. तसेच शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानाचेही त्यांनी कौतूक केले. या अभियानात उत्तम काम झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी या अभियानानिमित्त अधिकाधिक प्रलंबिततेचे निराकरण करुन नागरिकांना उत्तमोत्तम सेवा द्याव्या. गरजूंपर्यंत लाभ पोहोचवावा,असे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले.

अकोला तालुक्यात १ लाख ५३ हजार ३७१ जणांना लाभ

उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली की, दि.२६ जानेवारी २०२३ पासून राज्यात महाराजस्व अभियान २.० सुरु झाले आहे. तेव्हापासून  अकोला तालुक्यात  १ लाख ५३ हजार ३७१ लाभार्थ्यांना विविध विभागांमार्फत शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे.शासन आपल्या दारी अभियानामुळे नागरिकांना एकाच छताखाली शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. योजना व लाभार्थी संख्या (दि.२६ जानेवारी २०२३ पासून लाभ दिलेल्या) याप्रमाणे-संजय गांधी निराधार योजना- ५७६, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना-५४१, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना-३४, मतदान ओळखपत्र वाटप-२७७३, शिधापत्रिका-११९० (केशरी-३२०,केशरी दुय्यम-५३१, पिवळे दुय्यम-२४७, शुभ्र-९२), प्राधान्य गट-६२००, ई-चावडी प्रणाली शेतसारा पावती-२०३, डिजीटल सातबारा-२५३२८, फेरफार उतारा-५३८०, नमुना आठ अ-११३४९, सेतू केंद्रामार्फत दाखले वितरण-२३७१३, नवीन तुती लागवड-७३, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम-४२, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम-१८८, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण-७६. मासेमारी साधनांचे खरेदीसाठी अर्थसहाय्य-१४० लाभार्थी, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना-४३३, प्रधानमंत्री आवास योजना-७६७९, आवास प्लस प्रपत्र ड-१२२८, रमाई आवास योजना-९३२, शबरी आवास योजना-९४, उमेद-७ बचत गट समूह, आयुष्यमान भारत डिजीटल मिशन-५०१८६, गोल्डन कार्ड-१०३०१, बेबी केअर किट-४५२, महाडीबीटी-१३९५, नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प-२२१७. 

Post a Comment

Previous Post Next Post