*मराठा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांचा अकोला दौरा*
अकोला :(सतिश लाहुळकर ब्यूरो चीफ अकोला)अखिल भारतिय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री संतोष नानवटे हे दिनांक ५/५/२०२३ शुक्रवार रोजी अकोला येथे पदाधिकार्यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष श्री राम मुळे यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री संतोष नानवटे यांनी सर्व पदाधिकार्यांशी संवाद साधला. पदाधिकार्यांच्या अडचणी समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे निराकरण केले. नवीन पदाधिकार्यांना आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी विषयी माहिती दिली समाजात तळागाळापर्यंत मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती देऊन जास्तीत जास्त समाजबांधवांना लाभ मिळवून देण्याचे निर्देश दिले.
या प्रसंगी अकोला तालुका अध्यक्ष ओमप्रकाश काळबांडे यांनी तालुका उपाध्यक्ष पदी नितिन मोरे यांची नियुक्ती राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री संतोष नानवटे यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष श्री राम मुळे, जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश ठाकरे, जिल्हा संघटक ॲड अमोल सुर्यवंशी, डॉ शशिकांत पवार, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष श्री राजुभाऊ वगारे, अकोला तालुका अध्यक्ष ओमप्रकाश काळबांडे, महिला तालुका अध्यक्ष सौ रेखाताई देशमुख, युवक जिल्हा अध्यक्ष सतीश मनोहरराव सुर्वे, तालुका सरचिटणीस वसंत खराडे, तालुका कार्याध्यक्ष विशाल तायडे, तालुका उपाध्यक्ष अशोक पाथ्रीकर, युवक जिल्हा संघटक योगेश काटे, युवक तालुका अध्यक्ष अमित देशमुख, युवक तालुका सरचिटणीस गोविंद चव्हाण, युवक तालुका संघटक सिद्धेश्वर देशमुख, भुजंगराव देशमुख तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.